विचार आणि आखूडदोषी बहुगुणीपणाची कसोटी : एक संक्षिप्त टिपण
मानव जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा विचारप्रवास/विचारप्रवाहसुद्धा प्रगत होत जाणे अगदी स्वाभाविक तथा क्रमप्राप्त असते. अशा विचार-प्रगती-प्रवासा/प्रवाहादरम्यान कोणत्याही विचारांना त्यांच्या ‘असण्या’तील ‘आखूडदोषी-बहुगुणीपणा’ची कसोटी पार पाडावी लागते. आखूड का असेनात, अंतर्निहित दोषांना पार करून व बहुगुणीपणाची लस टोचूनच विचारांच्या प्रवासा/प्रवाहात प्रगती संभव असते. विचारप्रवास व विचारप्रवाहातील ही कसोटी पार करू न शकणारे विचार कालबाह्य तथा …